गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होणार : सुरेश धस

Foto

बीड:  जगमित्र साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी करताना सरकारी जमिनीचे बेकायदा हस्तांतर करून घेतल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले असतानाच यावरुन आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांना चिमटा काढला आहे. गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होणार, असा टोला लगावत यंदाचे पावसाळी अधिवेशन ऐतिहासिक असेल, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील पूस, येथील जुने सव्र्हे नंबर २४, २५ आणि इतरही शासकीय जमीन आहे. ही जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी दिले होेते. या पार्श्वभूमीवर धस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुंडे यांच्यावर टीका केली. यंदाचे अधिवेशन ऐतिहासिक  ठरणार आहे. विधान सभेत विरोधी पक्षनेता नाही. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे गुन्हा दाखल होताच फरार होतील.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker